आणिक वाद्ये तेथे वाज
1075.
आणिक वाद्ये तेथे वाजताती अपार | उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
चिद्रत्न मंडप दिसला कल्लोळ | जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥
नक्षत्र गोंधळ उसळती भारी | चक्रे त्याजवरी उल्लाळती ॥३॥
मोतिये तोरणे लाविली अपार | झळकती तारे विभु ऐसे ॥४॥
नामा म्हणे देवा नवल केले गहन | पुंजाळिले गगन ज्ञानदेवे ॥५॥
