वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

माझया मीपणचा करोनि फ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089782 · अभंग क्र. २०३

203.
माझया मीपणचा करोनि फराळ ।
उरले खावयासी बैसला सकळ ।
ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ ।
यासि न पुरेचि ग्रासिता माझा खेळ वो ॥१॥
आता काय देऊ नसंता जवळी ।
संचितप्रारब्ध ते भक्षिले समुळी ।
कर्माकर्माच्या घेतल्या कवळी ।
विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥
भक्षिले संपत्ती विपत्तीचे भोग ।
काही नुरविताचि कोणाचाही भाग ।
अवघे भक्षूनिया नुरवि हा माग ।
नामरुप तेही नेदीचि उरो सोंग वो ॥३॥
ऐसा भक्षूनिया पूर्ण नव्हे कधी ।
अवघ्या भक्षूनिया संसारउपाधी ।
जीव भवाचिया नुरवूनिया आधी ।
केले येका येकि निजरुप अनादि वो ॥४॥
आधीचि दुर्बळ मी नव्हति काही जोडी ।
पूर्वीच भक्षूनिया गेला वो तातडी ।
आणू कोठूनि वाढू या परवडी ।
हा तो भुकाळुचि सदाचा बराडी वो ॥५॥
आता तृप्तीलागी दिसे एक शेवटी ।
भावभक्ति याचे वोगरीन ताटी ।
तेणेचि होईल हा क्षुघेचि संतुष्टी ।
ऐसे निळा म्हणे विचारिले पोटी वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग