वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

न बोलसी ते ही कळले द

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072944 · अभंग क्र. ४०२९

4029.
न बोलसी ते ही कळले देवा । लाजसी आपुलिया नावा । तुज मी घालीत नाही गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
उतरी आपुला हा भार । मजशी बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥
दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानुशक्ती ठाकेल तैसी । बाधी दोघासी विन्मुखता ॥३॥
म्हणोनि करितो मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळे नेमास आपुलिया ॥४॥
तुझे म्या घेतल्या वाचून । येथूनी न वजे वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाही म्हण तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
देवा तू माझ्याशी का बोलत नाहीस हे मला कळले आहे तुझे पतितपावन असे नाम आहे त्याप्रमाणे तू वागत नाहीत त्यामुळे तू माझ्याशी बोलण्यासाठी लाजत आहे. हे केशवा देवा मी तुला कसल्याही प्रकारची भीड किंवा संकट घातलेले नाही. त्यामुळे हे देवा तू माझ्याशी बोल आणि आपला भार उतरव. देवा माझा जर तुला अंगीकार करायचा नसेल तर मग मी संतांना शरण जाण्याचा विचार करीन. याचकाला दान देण्याविषयी दात्याची अशी धर्मनीती आहे की याचक जर दात्याच्या दारात दान मागण्यास गेला तर दात्याने आपल्या यथाशक्तीनुसार याचकाला दात्याला दान दयावे आणि याचकाने ते दान स्वीकारावे. परंतू जर याचकाने दान स्वीकारण्यास आणि दात्याने दान देण्यास विन्मुखता दाखविली तर दोघेही पातकी ठरतात म्हणून तर देवा मी मोठया अपेक्षेने तुझे बोलण्याची वाट पाहात आहे. त्यामुळे तर देवा मी मोठा धीर धरुन तुझी प्राप्ती जेणे होईल ते सायास करीत आहे आणि तुझ्या प्राप्तीचे जे नियम आहेत त्या नियमाला मी कधीही चुकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू माझा स्वीकार केल

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग