वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सद्गुरूवचनाचे करी अम

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076050 · अभंग क्र. ५२८

528.
सद्गुरूवचनाचे करी अमृतपान ।
जन्ममृत्यु जाण नासतील ॥१॥
होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा ।
मने काया वाचा शरण जाई ॥२॥
सद्गुरूचे तीर्थ अमृताची वाटी ।
नित्य सेवी तुटी नको आणू ॥३॥
बहेणि म्हणे जीवी होसील संतुष्ट ।
सद्गुरूवरिष्ठ पूजिलिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग