काजळासारिखी कस्तुरीह
529.
काजळासारिखी कस्तुरीही काळी ।
गुणे ती वेगळी आपुलाल्या ॥१॥
जाणता तो जाणे दोहीचा पारखी ।
सगुण विवेकी ज्ञानवंत ॥२॥
तक्र आणि दूध वर्ण ते समान ।
परि वर्म भिन्न भिन्न त्यांचे ॥३॥
बहेणि म्हणे गारा परिसही शुभ्र ।
नीर आणि अभ्र समत्वची ॥४॥
