सांगेन ते ऐक जन्मांत
160.
सांगेन ते ऐक जन्मांतर कथा ।
जेणे तुजचित्ता सुख वाटे ॥१॥
गोदावरी जेथे प्रगट ब्रह्मगिरी ।
वैश्य क्रमील तुजपाशी ॥२॥
नाम हो तयाचे वर्धमान शेटी ।
धनवंतात कोटी दानपुरूष ॥३॥
तयाची हे भाज भामिनी सुंदरा ।
पतिव्रता खरा धर्म तिचा ॥४॥
तीन पुत्र तिसी चौथा तू पाळक ।
होउनी बाळक अससी तेथे ॥५॥
धन्य धान्य द्रव्य गायींची गोठणे ।
नसे काही उणे घरी तया ॥६॥
वर्धमान शेटी सर्वांमाजी श्रेष्ठ ।
जाला स्थानभ्रष्ट एक वेळा ॥७॥
येउनी पांचाळी करी अनुष्ठान ।
यज्ञ तो संपूर्ण थोर केला ॥८॥
तयाचा हा हेत कन्या व्हावी मज ।
भामिनी सहज रूपवंती ॥९॥
तियेचे हे पोटी जाले मी निर्माण ।
माझे नाम जाण हेमकळा ॥१०॥
तयासी संतोष देखोनी वाटला ।
दानधर्म केला यथाक्रमे ॥११॥
लग्नविवंचना करी वर्धमान ।
तव जाले स्वप्न भामिनीसी ॥१२॥
लग्न करू नको इये कन्यकेचे ।
रूप वरक्तीचे हेमवती ॥१३॥
रागकला नाम ब्राह्मणाची सेवा ।
आठवी केशवा सर्व काळ ॥१४॥
तेथेही संगती जाली तुज मज ।
आंतरीचे गूज तुज सांगे ॥१५॥
वर्षे ते चोवीस आयुष्यमर्यादा ।
सारूनी स्वानंदा देह गेला ॥१६॥
ऐसे तीन जन्म वैशाचिये याती ।
घेवोनी विरक्ती वर्तिन्नले ॥१७॥
बहेणि म्हणे आता चौथा जन्म ऐक ।
करोनि विवेक सुखे राहे ॥१८॥
