हिंदु तुर्क-संवाद ३९
3970.
हिंदु तुर्क-संवाद ३९७०
प्राप्ती एक भजनविरुध्द । दोहींचासंवाद परिसावा ॥१॥ हिंदुकु तुरक कहे काफर । तोम्हणें विटाळ होईल परता सर । दोन्हींशी लागलीकरकर । विवाद थोर मांडला॥२॥सुनरे ब्रह्मणमेरी बात । तेरा शास्तर सब कुफराता खुदाकु कहतेपाऊहात । ऐसी जात नवाजे ॥३॥ ऐक तुर्का परममुर्खा । सर्वांभुती देवो देखा । हा सिध्द सांडुनिआवांका । शुन्यवादका झालासी ॥४॥ सुनरे ब्रह्मनपानबुडे । बुडक्या मारेपानकुकडे । तुम्हारा शास्त्रजो कोई पढे । वो बडे नादान॥५॥कमाखलोकोशास्त्र चलाया । खुदाकु कहते भीक मंगणे गया । बलीने पकड द्वारपाल कीया । लोक भुलायाहिकाकतसे॥६॥ तुम्हारा शास्त्र सबही ढिला । अल्लापरलेते हिल्ला । क्या भारुवलविल्ला । कमअकलोके ये बात ॥७॥ तुमची किताब तुम्हांसीनाठवे । सुलखनमो मीन पढा देवे । प्रथम अबदुल्लाहुवे । तो म्हणे भीक भिस्तके मेवे । ही भीक तुमचीयादेवें उपदेशिली॥८फकर अबजुल्ला खुदाकु भावेभिक देता लेता भिस्तकु.जावे । भिक्षा पावनपरप्रभवे । हे दीक्षा देवे दाविली॥९॥फकिर साक्षबोलतो । फकर फजतारी खुदानें नवाजा है । फकरआकरिब खुदाकुं । फकर भावता खुदाकुं । फकरन्याखुदाकु । फकर लाहिला खुदाकू । फकर अल्लेखुदाकू । फकर लोडे खुदाकू ॥१०॥ बय तत्वकलिहा । जीयादार हाजरत । गाजाया दरगाज । मोंकी दरभिस्तरल्फा गाफील दरदोकुं जा । अल्लायेर खालीकी । गाफीला दरदोगखी । फकिरमागतोभीकाअल्ला दोष नेला । अल्ला वलकलतालील तुंअल्ला । हारसीर मौजुद तुं अल्ला । खालीफ तुअल्ला । नजर नाजीरतुंअल्ला । आकील आकीलातुं अल्ला । जीव जीवा तुं अल्ला । पोट भरावयाभीक तुं अल्ला । दोष नेला । आणा तुपरोटीकानवला । अल्ला दुधभात दे मला।अल्ला मांडेपुरीघारी देमला । अल्ला वडेवडुचे दे मला । अल्लाक्षीरसाखर देमला । ब्राह्मण श्लोक बोलतो । भिक्षाहारी निराहारो भिक्षा नैव प्रतिग्रहः । असंतुष्ट : सदापापी संतोषी सोमप: स्मृत: । बळी खुदाचा खासाबंदा । त्याच्या भुलला भक्तिवादा । त्यापाशी देवतिष्ठे सदा । तुम्ही का निंदा करितसां॥११॥तुम्हाराब्रह्मा बेटी चोद । वो पढे सब झुटे वेद । तुम्हाराशास्त्र वेद । ब्रह्मनाद लतीफ॥१२ । झुटे लतिफेंकैंव कैंव चलाये । खुदाकी औरत चोर ले गये । उसेबांदरे मदत हुवे । ओ शास्त्र पढ़ पढ मुवे । गफलतखाय गुमारे॥१३॥जीस म्हणा बीबी आई । सोबनकरा तीयो ठायी । तुरकाची निष्ठाई पाही । ब्राह्मणाच्या ठायी निंदीती ॥१४॥बाबा आदममायाहुवा जोडा । हे किताब तुम्ही पढा । आपुलें शास्त्रनेणाधडफुडा । आम्हांसी झगडा का करिता ॥१५॥ बाबा आदम माया हवा जाली । त्यापासुनी दुनियांअदमी झाली । आदमनामें सांगा आपुली । बोलतांभुलि तुमची तुम्हा ॥१६॥बाबा आदम माया हवाजाहली । ती म्हणता तुम्ही सैताने नेली । सीतारावणेचोरिली । ते का बोली उपहासा ॥१७॥ तेव्हांफरिस्ते बैठे केले । जबराईल । ईजराईल । मनकाईला नसकाईला मितकाईलाफत्ते माया हवाघेऊनी आले । रामे जुत्पती बोलविले । सीताशुध्दीकरावया॥१८॥सुनरे ब्रह्मन अक्कल गधडे । जबा_ दराजी जबा जोडे । तुम्हारा शास्त्र जो कोई पढे । ओ बडे गाफील ॥१९॥गाफिलो खुदा बंद खानोलाया । उसे कंसासुर मारणें आया । देवकिंने खुदाछुपाया । ओ शास्त्र भुलाया नादान ।२०॥छपेछपे बंद खुलास किया । इन्ने बातपर बोध लाया । खुदाकु कहे जेहेर पिलाया । या हिला या सालीम ॥२१॥ आपने मुसे आपफजित होते । खुदाकू कहतेंगोरुरखते । वो बाता सुन सुन रोते । खुदाकु कहतेढोरकी॥२२॥काफरने अक्कल छोडी । खुदाकीबढाई साली तोडी । क्या मारूंका थपडी । जबाजोडीभी करतां॥२३॥तुमचे मुसाफ पहा बोलोकाहीं । खुदा मौजुद सर्वांठायीं । तो काय बंदखानीनाही । हा विरोध वाया तुम्ही माना ॥२४॥जहांमनकी बढाई । तहां खुदा एकलासा नाही । गैबमोखुदा छुपा भाई । हे फारसी पाही तुम्ही पढा ॥२५॥ दील खुदाकु मुष्किल धरे । तो दिलम्यानेखुदा भरे । बंदका बंद खुलास करे । हे हादी पैंगबरबोलेजे॥२६॥आवलीया । आवलीया शहामोदीनआली । आली अपरसुन बोली । गाय गज बांदरे । समस्त रक्षिजे परमेश्वरे । ही तुमचियें किताबें उत्तरे । तुम्ही त्या कारे मानाना ॥२७॥कुत्ता कव्वा चुवडेचिचडे । वोही रक्षने खुदाकडे । आपले शास्त्र नेणाधडफुडें । आम्हासी झगडे का करिता॥२८।तुंरहे रहे ब्रह्मन जोकांडी । तुं क्या क्या हा हीकातमांडी । बंदगी करना सालीम लंडी । सीरदाढी मुंडीखुदानें ॥२९॥तुम्ही हिंदु अस्सल बुरे । फत्तरकेपुतले राज करे । उसका नाम खुदा धरे । एकतारीकरे उस जगा ॥३०॥उसके हुजुर पुराना पडे । औरत मर्द सब खडे । उसके आगे लिडीलिडी पडे । नव्हे बडे नादान॥३१॥जीस फत्तरपर शेंदुरचढे । उसके आगे औरता खडे । निंब पहेरनमे नंगे खडे । मागे पोंगडें उनके पास॥३ । तुम्हारा वेद सबहीढीला । तमाम बैता नामाकु ला । पनर बंदगी करोगलबला । खुदा गाफील गफलती॥३३॥जळींस्थळीं काष्ठी पाषाणी देव । हा तुमचे किताबाचामुख्य भाव । तुमचे तुम्हांसी न कळे पहा हो । पुर्णअभाव तुर्काचा॥३४॥थिजलें विघुरले तुप एक । तैसे सगुण निर्गुण एकत्र देखा तुम्ही प्रतिमेचा करितांद्वेष । परम मुर्ख अविवेकी॥३५॥जीजी नेत करीबंदा । तीती पुर्ण करी खुदा । तुमचे किताबाची बाधा।तुमचे बोधा का नये॥३६॥तुमचा अभाव तुम्हांसीप्रगट केला । जवळील खुदा दुर बोभाईला । एकबारअल्ला एकबार अल्ला । बाकी हैरान झाला । नाहीभेटला अद्यापी॥३७॥दुरिलासी हाक मोठी । जवळीलासी कान गोष्टी । तुम्हांसी निकट झालीभेटी । ओरडोनि उठी मुख्य मुलांना॥३८॥खुदामाना पश्चिमेकडे । येर अवघे कांवोस पडे । मौजुदम्हणा चहुकडे । हेहि धडफुडे । तुम्ही नेणां॥३९ । पांच बखत खुदाचे झाले । बाकी बखत काय चोरीनेले । तुमचे शास्त्र तुम्ही भुलले । देवासी केलेएकदेशीं॥४०॥आम्हासी म्हणता पुजिता फत्तरे । तुम्ही का मुडद्यावर ठेवितां चिरे । दगडाचे पुजितांहाजीरे । पीर खरेते माना॥४१॥केवळ जे का मेलेंमढें । त्यांची जतन करिता हाडे । फुल गलफ फतरियावरी चढे । उदसो पुढे तुम्ही जाळा॥४२॥गंगा न्हावो तुम सबले पाक । तो केंव करते जुदा । जुदा सैंपाक । बीटाल बीटाल कर मारे हाक । सबनापाक दोजखी॥४३॥कहो सर्वाभुती भगवद्भावो॥बोले एक जगे खाना कोन खावो । एक एकीसकु । हात न लावो । जुदा जुदा ठावो अलाहिदा॥४४॥खाना खाते उनका दाना उसपर चढे । तो उसकीनरडी लेने दवडे । आध किया मत छोडे । दोनोरौतखडे जमातमो॥४५॥औरत आपकी घरखानाखावे । उसे सैंपाकमे ती बाहेर करावे । रात ज्याकरउसपास सोवे । तव नाकहे नापाक॥४६॥जिसकीबेटी लवंडी लावे । उस संबंधीके घर खाना न खाये । बेटी भावे खाना न भावे । बडे किताब बह्मनके॥४७॥आमचा सैंपाक परम निष्ठा । त्याचा सैंपाकपरमखोटा । संबंधीमें समंदिष्टा । शास्त्र झुटा तुम्हारा॥४८॥बेटी पाक बाप नापाक । तुम्हारे शास्त्र कीहुवी राख । कर्म धर्मकु पडे खाक । हिला दोजकबह्मनकु॥४५॥तुम्ही तुरक परममुर्ख । नेणांसदोषनिर्दोष । प्राणी प्राण्यातें देता दु:ख । भिस्ती मुखतुम्हां कैचे॥५०॥खुदा मारितोमुरदाड देख । तुम्हीमारा तेपवित्र चोख । खुदापरिस तुम्ही झालात पाक । यवन हल्लक दोजकी॥५१॥जबे करुनी तुम्हीसांडा कुकडे । फडफडीत तुम्हांपुढे येणे तुम्हांसकाय सबब जोडे । पढत वेडा मुलांना सालीम॥५२॥जबे केलिया भिस्त पावे बकरा । तरी तुम्हीनिजाम रोजे का करा । आपली आपण का न करा । भिस्तीच्या घरा जावया॥५३॥हजार जबे करीएकला । एक उठविता तरी मुलाणा भला । भिस्तीश्रम व्यर्थपडला । दोष पडला प्रत्यक्ष॥५४॥हिंदुमुसलमान दोई । खुदानें पैदा किया भाई । तुर्ककीनिष्ठा पाई । हिंदुकुपकडकर मुसलमान करो॥५५॥हिंदुकरितां खुदा चुकला । त्याहुनी थोर तुमच्याअकला । हिंदुस मुसलमान केला । गुन्हा लाविलादेवासी॥५६॥जबे करणारकु परम दोख । तुरक । कहे वो सच्चा देख । गुना लाया इने एक । झगडानाहाकी करना॥५७ । जबे करिता मुलाना बैकतबोले । कभी उठावनकू जीभ न हाले । वो खुदाबिगर किसका न चले । बह्मन बोले वो सही बाता॥५८॥नरडी काटेभिस्ती दस्त । वोजातका मगनमस्ता आगलेकु करितांखस्ता खुदा शास्त करेगा॥५९॥ब्राह्मणम्हणे अहो जी स्वामीं । वस्तुतां एकआम्ही तुम्ही । विवाद वाढला न्याती धर्मी । जातांपरब्रह्मी असेना॥६०॥तुरुक कहे वो बात सही । खुदाकु तो ज्यात नहीं । बंदे खुदाकु नहीं जुदाई । वो कह्या रसुल्लीला हाजरत परदे॥६१॥सर्वधर्मज्याचा निमाला । मनोधर्म तुरके ऐकिला । आनंदपरम जाहला । मंत्र केला उपदेश॥६२॥ते वेळीकेले नमन । येरे आदरे दिधले अलिंगन । दोघांसिजाहले समाधान । आनंदें संपुर्ण निवाले॥६३॥आम्ही तुम्ही केला झगडा । तो परमार्थाचा बोधउघडा । प्रबोधावया महा मुढा । कर्म जडा उद्बोध॥६४॥शब्दी मीनला शब्दार्थ । दोहींसी बाणलापरमार्थ । परमार्थ मनोरथ । झाले तृप्त दोहींसी॥६५॥ऐक्यवाद विवाद । विवादी जाहला अनुवाद । एका जर्नादनी निजबोध । परमानंददोहीसी॥६६॥
