वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079550 · अभंग क्र. ३६११

3611.
(निर्याणाचे अभंग)
गरुडाचे पायी । ठेवी वेळोवेळा डोई ॥१॥
वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धरी ॥धृपद॥
पाय लक्ष्मीच्या हाती । म्हणोन येतो काकुलती ॥२॥
तुका म्हणे शेषा । जागे करा हृषीकेशा ॥३॥

अर्थ :
मी गरुडाच्या पायावर वेळोवेळी डोई म्हणजे माझा माथा ठेवीत आहे आणि त्याला विनवणी करीत आहे की, हे गरुडा माझ्यासारख्या दीनाचा उध्दार करण्यासाठी वेगाने तू हरीला आण. हरीचे पाय लक्ष्मी मातेच्या हातातही आहेत ती तिच्या हाताने त्यांची सेवा करत आहे त्यामुळे मी लक्ष्मीमातेलाही काकूळतीला येतो आहे आणि तिलाही विनंती करीत आहे की हरीला माझा उध्दार करण्यासाठी लवकर घेऊन यावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे शेषा तुम्ही देखील माझ्या हरीला लवकर उठवा आणि माझा उध्दार करण्यासाठी लवकर माझ्याकडे पाठवा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग