(निर्याणाचे अभंग)
3612.
(निर्याणाचे अभंग)
तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥धृपद॥
भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ॥२॥
तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥
अर्थ :
हे सनकादीक संतहो तुम्ही स्वत:ला कृपावंत म्हणून घेता मग, तुम्ही माझ्यावर एवढाच उपकार करा देवाला माझा तुम्ही नमस्कार सांगा. माझ्यासाठी तुम्ही वैकुंठीचा राजा पंढरीनाथाला करुणा भाका त्याला एवढी एक विनंती करा की, तुकाराम महाराज म्हणतात, माझी आठवण देवाला लवकर काढायला सांगा आणि लवकरात लवकर मला मूळ पाठवायला लावा.
