वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

अवघाचि संसार करीन सु

🙏 4. संत नामदेव · ABH-082818 · अभंग क्र. १५१२

1512.
अवघाचि संसार करीन सुखाचा | जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ॥१॥
विठोबाचे नाम गाईन मनोभावे | चित्त तेणे नांवे सुख पावे ॥२॥
इंद्रियांचे कोड सर्वस्वे पुरती | मनाचे मावळती मनोधर्म ॥३॥
श्रवणी श्रवणा नामाचा प्रबंधा | नाइके स्तुतिनिंदा दुर्जनाची ॥४॥
कुंडले मंडित श्रीमुख निर्मळ | पाहता हे डोळे निवती माझे ॥५॥
विटेसहित चरण धरीन मस्तकी | तेणे तनु सुखी होईल माझी ॥६॥
संतसमागमे नाचेन रंगणी | तेणे होईल धुणी त्रिविध तापा ॥७॥
नामा म्हणे सर्व सुखाचा सोईरा | न विसंबे दातारा क्षणभरी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग