क्रिया कर्म धर्म तूं
1511.
क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे | राखेन मी तुझे द्वार देवा ॥१॥
मज पाळीसी तैसा पाळी दीनानाथा | न सोडी सर्वथा नाम तुझे ॥२॥
गाईन तुझे नाम हृदयी धरूनि प्रेम | हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥
नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा| तू आम्हा सोईरा आदिअंती ॥४॥
