बंधनी गुंतला देखोनिय
583.
बंधनी गुंतला देखोनिया पती | उडालीसे वृत्ति हरणीची ॥१॥
देहाची ते आस सांडोनि लवलाही | पडे रडे काही बोलवेना ॥२॥
म्हणे तुम्ही आता न जावे एकले | संगे आम्हा नेले पाहिजे जी ॥३॥
बहुता जन्मांची तुम्हा आम्हा गांठीं| आता कैसी तुटी पाडितसा ॥४॥
भोग जे भोगिले स्वप्नप्राय जाली| नाही ते पुरली वासना है ॥५॥
नामा म्हणे विषयवासना वोंगळ | तेणे कोण्या काळे सुटिजेना ॥६॥
