वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

देखताचि कांता दुःखी

🙏 4. संत नामदेव · ABH-083629 · अभंग क्र. ५८४

584.
देखताचि कांता दुःखी जाली फार| डोंगर तिजवर कोसळला ॥१॥
बोलता तियेसी न निघती बोल| ऐसाचि तो वेळ अवधारी ॥२॥
नको आता पडू मायेचिये भरी| जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥
माझी गति मज तुझी गति तुज | काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥
घरी तुझी बाळे गोजिरी गोमटी| जाऊनिया पोटी धरी त्यांसी ॥५॥
न लावी उशीर जाई वो माघारी| जव तो दुराचारी न देखता ॥६॥
बाळा पाळणा हाचि स्त्रियांचा धर्म | सांगते वर्म जाई आता ॥७॥
माझिया प्रारब्धी होते तैसे जाले | तू का येथे बळे प्राण देसी ॥८॥
नामा म्हणे ऐसे सांगे तिच्या हिता| परी ते नाइकता कष्टी होय ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग