वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

धर्मशास्त्री ऐसे बोल

🙏 4. संत नामदेव · ABH-083622 · अभंग क्र. ५८२

582.
धर्मशास्त्री ऐसे बोलताती बोलें| तेणे चोजवले चित्त त्याचे ॥१॥
आश्चर्याच्या डोही बुडाला पारधी | म्हणे कैसी बुद्धि याची पाहा ॥२॥
रानींची रानवटे तया एवढे ज्ञान | प्रेमाचे जीवन वोसंडत ॥३॥
चाकाटली वृत्ति चित्त केले स्थिर| दोघांची उत्तरे ऐकतसे ॥४॥
नामा म्हणे हरणीहरणाचा संवाद | ऐकता भवबंध तुटतसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग