इतुकियासाठी । बहु तु
29.
इतुकियासाठी । बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥
काय सांगावा विचार । दैव पारध्याचे थोर ॥२॥
झाली तीन प्रहर निशी । पूजा पावली देवासी ॥३॥
धाडियेले यमाला । सुखी कराया तयाला ॥४॥
आला तो धांवत । माग ह्मणे अपेक्षीत ॥५॥
त्याची विषयक भक्ति । पुढती झाली तया गती ॥६॥
जे जे याचके मागावे । ते ते दातयाने द्यावे ॥७॥
काय मागितले तेणे । तेचि नामा ऐका म्हणे ॥८॥
