दिव्य औषधीची वार्ता
281.
दिव्य औषधीची वार्ता ऐकोनिया कानी ।
व्याधी टाकी तनु ।
धालियाचे सुख भुकेला केवी जाणे कैसे निवे त्याचे मनु रया ॥
सुखाचा अनुभव कैसेंनि जाणावा ।
भेटींचे आर्त सकळांसही सारिखे होईजे देखा ॥
आपण जालिया जागा नलगे सांगावे ।
बापरखुमादेविवर विठ्ठल भेटलिया ।
तरी तुझी तुटतील सकळिक विंदाने रया ॥
अर्थ :
एखाद्या दिव्य औषधाची नुसती वार्ता ऐकल्याने देहाचा रोग नाहीसा होतनाही. जेऊन तृप्त झालेल्या मनुष्याचा आनंद भुक लागलेल्या मनुष्याला कळणार नाही. एकाच्या सुखाचा अनुभव दुस-याला कसा येईल. या करता जिवशिवाचे ऐक्य करून तो अनुभव पहावा म्हणून सुखाचा अनुभव ज्याचा त्यालाच झाला पाहिजे. व तो जीव शिवाच्या ऐक्याने होणारा आनंद सर्व मुमुक्षुस होईल. कारण आपण जागे झालो हे सांगयला लागत नाही. कारण त्याचा अनुभव त्यालाच असतो. रखुमादेवीचे पती व माझे पिता जे श्रीविठ्ठल त्याची भेट झाली तर तुझी सर्व संसारिक दुःख नष्ट होतील. असे माऊली सांगतात.
