वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

जनवन हरि ने पाहाता भ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074865 · अभंग क्र. २८०

280.
जनवन हरि ने पाहाता भासे ।
घटमठी दिसे तदाकारू ॥
फिटती भुर रे धुम उठी तेज ।
अक्षरी उमज गुरूकृपे ॥
खुटली मुक्ति राहिले अव्यक्ती ।
एकरूप ज्योती तदाकार ॥
ज्ञानदेव क्षर अक्षर उमजे ।
बापरखुमादेविवर हृदयी विराजे ॥

अर्थ :
जरी पहावयाच नाही म्हटले तरी सर्वत्र जनी वनी श्रीहरीच भासतो. घट मठ इत्यादी पदार्थ तदाकारच दिसतात. असा बोध झाला म्हणजे सर्व युक्त्या कुंठीत होऊन जातात. आणि एक परमात्मस्वरूपच शिल्लक राहाते.
नाहीसा झाला म्हणजे अग्नी प्रगट होता. त्याप्रमाण मायेचा निरास करून परमत्म्याचे ज्ञान करून घ्यावे. क्षर अक्षराचे स्वरूपहुन निराळा जो रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्यांना ओळखले त्यामुळे ते माझ्या हृदयांत कायमचा विराजमान झाले आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग