सर्वांग देखणे हाचि भ
282.
सर्वांग देखणे हाचि भावो जाण ।
येर निकारणे वाया ओझे ।
शक्तीचा पडिभरू वाहासील वाया ।
श्रीगुरूपाया शरण जाई ॥
नसंडी वेदसिंधु सांडी मांडी कर्म ।
उपाधीचा धर्म करू नको ॥
बापरखुमादेविवर देखणा सर्वदृष्टी ।
तेथे प्रपंच गोष्टी मुरालिया ॥
अर्थ :
श्रीहरि ज्ञानस्वरूप आहे. असा विश्वास धरून त्याचे चिंतन कर इतर शास्त्राध्ययनाचे ओझे टाकून दे. बुद्धिच्या सामर्थ्याची घमेंड धरशील तर फुकट जाशील. म्हणून मुकाट्याने श्रीगुरूला शरण जा. तसेच जो वेद त्याच्या उपदेशाप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करू नकोस. मात्र त्या नित्य नैमित्तक कर्माविषयी कर्तृत्वाचा अभिमान धरू नकोस. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल, ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्याठिकाणी प्रपंचाच्या सर्व गोष्टी नाहीशा होतात. असे माऊली सांगतात.
