देवकी करी चिंता । के
7.
देवकी करी चिंता । केवी आठवा वांचे आता । ऐसी भावाना भाविता । जिवी तळमळ ॥१॥ तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वये अयोनिया ॥२॥ हरि सुनीळ सांवळे । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥ ऐसे देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥ वेगी वसुदेवातें म्हणे । तुम्ही गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दने कृपा केलीं ॥५॥
