वेधला जीव माझा भेटवा
120.
वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग ।
जीवी जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥
ऐशी विरहिण बोले बोली । का रे हरी तु सांडी केली ॥धृ.॥
समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतले देवराया ।
तुं तंव मध्ये घालिसी माया । नको आता विरह पाया ॥२॥
आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी ।
एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥
