वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ते सुख सांगता वाचे प

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075832 · अभंग क्र. ५६७

567.
ते सुख सांगता वाचे पडे मौन ।
जाणता ते धन्य गुरूभक्त ॥१॥
झालासे आनंद इंद्रियांचे द्वारी ।
बैसले शेजारी चैतन्याचे ॥२॥
घट हा बुडावा जैसा डोहा-आत ।
न फुटता ओतप्रोत पाणी ॥३॥
बहिणी म्हणे तैसे झाले माझे मना ।
तुकाराम खुणा ओळखी त्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग