वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(डाकाचे रूपक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079479 · अभंग क्र. ३९१७

3917.
(डाकाचे रूपक)
खेचर खडतर । काळ कापती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणी ॥१॥
आता करी का रे हाकारा । सहस्रनामे एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगे धरूनी ॥धृपद॥
सीते झाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनी । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥
लाविले कावरे । प्रल्हादासी म्हैसासुरे । आली येकसरे । दात खात रंगासी ॥३॥
वसुदेवाची बाळे । सात खादली ज्या काळे । आली भोगवेळे । तया कारणे तेथे ॥४॥
पाडवे बापुडी । वांज केली फिरती वेडी । धावोनिया काढी । अंगसंगे त्राहाटविली ॥५॥
नामाचे चिंतन । तेथे धावते आपण । न विचारिता हीण । भाव देखे जयाचा ॥६॥
कुळींची कुळदेवता । तुका म्हणे आम्हा माता । काय भय भूता । काळ यमदूताचे ॥७॥

अर्थ :
पंढरपूरमध्ये भीमातीराला एकच देवी नांदते जेव्हा आपण नांव तिचे घेतो त्यावेळी कितीही भयानक भूत असले किंवा असुर असले किंवा काळ जरी असला तरी ते थरथर कापतात. तुम्ही सर्वांनी एकदमच सहस्त्रनामाने त्या देवीला हाका मारा. मग ती तुम्हाला जवळ घेईल आणि तुमचे संसाराचे भूत पळून लावील. सीतेला देखील एका रावण नावाच्या भूताने झपाटले होते त्यामुळे तिला अशोकवनात राहावे लागले. मग नंतर माझी जननी रामाच्या रुपाने तिथे मोकळे केस सोडून सीतेची सुटका करण्यासाठी गेले. प्रल्हादाला देखील हिरण्यकश्यपू नावाच्या एका दैत्याने फार वेड लावले होते सारखा विचारीत होता की, तुझा देव कोठे आहे. तेथे देखील माझी विठाई महिषासूरमर्दिनी दात खातच स्तंभ फोडून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी धावली. वसुदेवाची सात बाळे जी कंस नावाच्या काळाने खाऊन टाकली, कंसाचे पाप इतके वा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग