विकल्प वासना समूळ दे
3223.
विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥
आशापाश मोह सांडी तू निराळा । भजन ते गोपाळा प्रिय वाटे ॥२॥
भेद अभेददाचें मूळ आधी खंडी । भजन ते तोंडीं मग गोड ॥३॥
एका जनार्दनी शुद्ध हे वासना । तै नारायणा प्रिय भक्ति ॥४॥
