विषयाच्या व्यथें दुः
3224.
विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठे नाही ॥१॥
शुद्ध करूनि मन घ्यावें रामनाम । संतांचे पूजन क्रिया हेची ॥२॥
उपदेश किती सांगावा वेळोवेळां । अमंगळ अंधळा नेणे कांही ॥३॥
एका जनार्दनी विषयाच्या संगे । कर्मकांड लागे भोगणे तेथे ॥४॥
