वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

मागे तुम्ही वांटिले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089651 · अभंग क्र. ५१५

515.
मागे तुम्ही वांटिले लोका ।
सनकादिका पर्यंत ॥१॥
अधम तेहि थोराविले ।
आपणा केले सारिखे ॥२॥
नाही विचारिली याती ।
धरिले हाती प्रीतीने ॥३॥
काय त्यांचे क्रियाकर्मे ।
काही धर्म न विचारा ॥४॥
उदारपणा नाही सीमा ।
पुरषोत्तमा तुमचिया ॥५॥
निळा म्हणे सरते पुरते ।
केले किती वर्णावे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग