मायेची निवृत्ति केली
534.
मायेची निवृत्ति केली जव नाही ।
आत्मतत्व ठायी पडे केवी ॥१॥
यालागी सद्गुरू सेविती सज्ञान ।
मायेचे निर्शन करावया ॥२॥
द्वैताचा हाराश केला जव नाही ।
आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥३॥
कल्पनेचा ठाव पुसिला जव नाही ।
आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥४॥
भ्रांतीचे हे स्थान छेदिले जव नाही ।
आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥५॥
अहंकार देहीचा गेला जव नाही ।
आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥६॥
बहेणि म्हणे ज्ञान साधिले जव नाही ।
आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥७॥
