वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

वाराणसी यात्रे जाईन

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072852 · अभंग क्र. ३८

38.
वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन ।
त्रिवेणीय स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पायींची वीट । मी कई बा होईन ॥२॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचे फळ लाहीन ।
अब्जक तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥३॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्य शिखर पाहीन ।
पाताळगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥४॥
मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन ।
गहनगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥५॥
कोल्हापुरी यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन ।
विशाळ तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥६॥
एका अंगुष्ठी तप करीन । पृथ्वी पात्रचि लाहीन ।
देह कर्वती देईन । परी मी वीट नव्हेन ॥७॥
बहुता पुण्याच्या सायासी । चरण जोडले विटेसी ।
निवृत्तिदासु म्हणे परियेसी । परी मी वीट नव्हेन ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग