वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

जोडोनिया जोडी जेणे ह

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072856 · अभंग क्र. ३९

39.
जोडोनिया जोडी जेणे हुंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे । सदैव साभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥
आपण न करी यात्रा दुजियासि जावो नेदी । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी ॥३॥
ऐसे जे जन्मोनी नर भोगिती अधोर । न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४॥
पुंडलीके भक्ते तारिले विश्र्वजना । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर पाटणा ॥५॥
काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग