वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

लक्ष चौऱ्यांशी येऊनि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074436 · अभंग क्र. ५३७

537.
लक्ष चौऱ्यांशी येऊनिया प्रती ।
कोटीफेरे होती कोटी जीवा ॥१॥
परी ही मनुष्य देहत्वप्राप्ती ।
लाभ नाही हाती अवचिता ॥२॥
नवमास मायेने वाहिले उदरी ।
तिजप्रती सोयरी आणिक नाही ॥३॥
कामधेनु म्हैशी आणिक दासदासी ।
धन बहु सायासी मिळविले ॥४॥
तुझिया धनासी नाही रे बाळका ।
अंतकाळी देखा एकलाची ॥५॥
हातींच्या पवित्रा कानाचिया नगा ।
धावोनिया वेगा हिरोनी घेती ॥६॥
स्तनपान देउनी मोहे प्रतिपाळी ।
तेही अंतकाळी दूरी ठेली ॥७॥
आंगीची लुगडी काढा फेडा म्हणती ।
बांधोनिया देती यमा हाती ॥८॥
ऐसा हा संसार मायेने वेष्टीला ।
म्हणूनि दुरावला योगेश्वरा ॥९॥
ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई ।
दाखविली सोयी साची असे ॥१०॥

अर्थ :
चौऱ्यांशी लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनीत कोटी कोटी वेळेला जन्माला यावे लागते या योनीमध्ये जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरणारे कोट्यवधी जीव आहेत असे फेरे फिरत असता मोठ्या भाग्याने अवचित जीवाला मनुष्य जन्माची प्राप्तो होते. या संसार फेऱ्यातून सोडविणारा दुसरा कोणीही नाही, जन्मदात्या आईने ९ महिने पोटांत वागविले व तिचे प्रेम तुझ्यावर होते. तरी तो जन्म देण्यापुरतीच उपयोगी पडणारी आहे. गायी म्हशी, नोकरचाकर धन जरी मोठ्या प्रयत्नाने मिळविले तरी ते शेवटी उपयोगी पडणारे नाही. उलट अंतकालच्या वेळी 'तुझ्या हातातील पवित्रक, कानातील दागिने काढून घेतील. जिने तुला पाजवून लहानाचे मोठे केले तीही अंतःकाळी दूरच राहीली. अंगावरची चांगली वस्त्रे काढून घेऊन तुला यमाच्या स्वाधीन करतात. अशा हा मायिक संसारामध्ये तू गढून गेल्यामुळे तुला योगेश्वर परमात्मा दूर राहीला. त्याची तुला प्राप्ती करून घेता आली नाही. हे मुक्ताबाई त् धन्य आहे तूच आम्हाला खरी सोय दाखविली. तात्पर्य, माझ्या मुक्ताबाईला खरी सोय कळतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग