वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

पूर्वेचा हा भानु उगव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074433 · अभंग क्र. ५३६

536.
पूर्वेचा हा भानु उगवेल पश्चिमे ।
परी भूमि जन्म नसे आम्हा ॥१॥
वांझेचा कुमर दिसेल प्रगट ।
न दिसे जरठ जड दष्टी ॥२॥
सिंधु येऊनिया मिळे सरितेमाजी ।
परी आत्मकाजी क्रिया नको ॥३॥
पूर्ण ज्ञानदेवा प्राप्त आत्मरूप ।
त्रिविध हे ताप निरसती ॥४॥

अर्थ :
पूर्वेचा सूर्य एखाद्यावेळेस पश्चिमेला उगवेल परंतु या कर्मभूमीत आम्हाला जन्म येणार नाही. कदाचित वाझेचा पुत्र प्रत्यक्ष दिसु शकेल पण वार्धक्य अथवा मंददृष्टी आम्हाला येणार नाही. कारण आम्हाला जन्म नसल्या मुळे आम्ही षड्भावविकाररहित आहोत. समुद्र गंगेस मिळणे ही अशक्य गोष्ट एखाद्या वेळेस शक्य होईल पण आत्म्याच्या ठिकाणी कोणती क्रिया होऊ शकणार नाही. आम्हाला ब्रह्मस्वरूप पूर्ण प्राप्त झाल्यामुळे आमचे त्रिविध ताप नाहीसे झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग