सहस्रनामाची घालिता ल
504.
सहस्रनामाची घालिता लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो ॥१॥
पुराणप्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या । प्रत्यक्ष देखा-व्या कोणे ठायी ॥२॥
अंगअनुभवा आपण आणाव्या । तरीच वाणाव्या संतांपुढे ॥३॥
नाही तरी मज वाटे कांनकोडे । सुधा ह्मणे तोंड चवी नेणे ॥४॥
नामा ह्मणे असे पोटामध्ये भूक । तृप्तीचे ते सुख बोलो कैसे ॥५॥
