सगुण समान भजती अंतरी
503.
सगुण समान भजती अंतरी । सर्व भूतांतरी असे एक ॥१॥
पहा कोळियाची काय सांगो कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्ति पुढे ॥२॥
द्रौपदीचे घरी होते उपवासी । देंठहि लावीसी अक-स्मात ॥३॥
नामा ह्मणे जाण प्रारब्ध कारण । पांडुरंगाविण यति नाही ॥४॥
