मग लाउनी शिंकियाच्या
104.
मग लाउनी शिंकियाच्या हारी ।
बैसल्या जागत आपुल्या घरी ।
कवडाआड आणि माजघरी ।
शिंकिया जवळी भोवताल्या ॥१॥
पाटीये तळी झांकोनी दीप ।
बैसल्या दवडोनिया झोप ।
तव हा सच्चिदानंदस्वरुप ।
आला चोरिये त्याचि घरा ॥२॥
गडी ठेवूनिया बाहेरी ।
चाहुली मारुनिया संचार करी ।
तव या शिंकियाचिया हारी ।
चाचपडता सांपडल्या ॥३॥
तेणे हरिखेला अंतरी ।
म्हणे आता साधली चोरी ।
बरा निवाड फावला वरी ।
निजल्या नारी नेणती ॥४॥
गोड चाखोनिया ते पाहे ।
हातोहाती लांबवीत जाय ।
दूध लोणी वरील साय ।
दही साजुक विरजले ॥५॥
आपण खाये गडिया चारी ।
गोड आहे म्हणे हरी ।
कुचकुचिती हळूचि करी ।
म्हणती बाहेरी निघावे ॥६॥
तव सांचल ऐकोनिया गौळणी ।
आवेशे धाविल्या अवघ्याजणी ।
दीप उघडिला तव हा नयनी ।
देखियला चोरिये भक्षिता ॥७॥
झडा घालुनिया वरी ॥
कवळिल्या अवघ्या नारी ।
म्हणती कैसी करुनी चोरी ।
घरे आमुची बुडविली ॥८॥
निळा म्हणे बोलोनि ऐसे ।
चरणी बांधति आवेशे ।
तया किंव दावितसे ।
म्हणे मी आलो भुलोनिया ॥९॥
