वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

काली माजुम घेतला होत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089893 · अभंग क्र. १०५

105.
काली माजुम घेतला होता ।
गडियांसवे म्या नेणता ।
तेणेचि आजि माझिया चित्ता ।
झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥
न ये सोडाल आजि तरी ।
तुमचे घरी न करी चोरी ।
मस्तक ठेवितो पायांवरी ।
करा उपकार आजि मज ॥२॥
एकी म्हणती विश्वास नाही ।
याचिया शब्दाचा वो काही ।
आजि सोडिता हा उदयांही ।
ऐसेचि करील येउनी ॥३॥
अवघाचि चोरुनीया गोरस ।
नित्य खातो सावकाश ।
आमुचे घरी नुरवी लेश ।
पहा माणसे रोडेली ॥४॥
आपुलिये हा सुटिकेसाठी ।
उदंड सांगेल ऐशिया गोष्टी ।
परि निष्ठूर आणि कपटी ।
या ऐसा नाही भूमंडळी ॥५॥
आता यासि न्यावे तेथे ।
यशोदे दावावे निरुते ।
तियेसि सत्य वाटत नव्हतं ।
फेडावा संदेह तियेचा ॥६॥
निळा म्हणे मग बांधोनी गळा ।
धुलकाविती अवघ्या बाळा ।
गाळी वोपुनिया सकळा ।
आणिला धरुनी यशोदेपे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग