शरणागता तारी भवसिंधु
159.
शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवी बा तो हात शिरावरी ॥१॥
अरण्यांत दुष्ट दैत्यांसी मारीत । ठेवी बा तो हात शिरावरी ॥२॥
वेणू पांवा जया हातांत शोभत । ठेवी बा तो हात शिरावरी ॥३॥
घेवोनी शिदोर्या गडयांसी वांटीत । ठेवी बा तो हात शिरावरी ॥४॥
रक्षावया व्रजा उचलिला पर्वत । ठेवी बा तो हात शिरावरी ॥५॥
सुवर्णाची कडी भूषणे अमूप । पाहता निष्पाप नामा म्हणे ॥६॥
