कृपा तुमची फळा आली ।
771.
कृपा तुमची फळा आली ।
बुध्दी झाली निश्चळ ॥१॥
नामचि एक उच्चारिले ।
तेथेचि बैसले मन माझे ॥२॥
इंद्रियांची पुरली धाव ।
बुध्दिभाव ठसावला ॥३॥
निळा म्हणे निरंतर ।
न पडे विसर चित्तासी ॥४॥
771.
कृपा तुमची फळा आली ।
बुध्दी झाली निश्चळ ॥१॥
नामचि एक उच्चारिले ।
तेथेचि बैसले मन माझे ॥२॥
इंद्रियांची पुरली धाव ।
बुध्दिभाव ठसावला ॥३॥
निळा म्हणे निरंतर ।
न पडे विसर चित्तासी ॥४॥