वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुज पावावया मार्ग अस

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075999 · अभंग क्र. ४७१

471.
तुज पावावया मार्ग असंख्यात ।
घाबरले चित्त होते माझे ॥१॥
नाम निःसंदेह सापडले वर्म ।
आता माझे प्रेम उच्चाटेना ॥२॥
कर्माचे कचाट वोसंतील कोण ।
पहा स्त्रीदेह जाण असे माझा ॥३॥
योगाच्या अभ्यासे आड येती सिद्धि ।
तयामाजी बुद्धि स्थिर नव्हे ॥४॥
ज्ञान तो अगम्य नयेचि समता ।
तेथे नव्हे चित्ता समाधान ॥५॥
बहेणि म्हणे आम्हा हे सांगती ।
याची माझी गति एक जाली ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग