वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

चंद्रतारांगण नैऋति भ

🙏 4. संत नामदेव · ABH-083341 · अभंग क्र. ६७०

670.
चंद्रतारांगण नैऋति भास्कर | तटस्थ निर्धार ब्रह्मादिक ॥१॥
ब्रह्मादि सकळ भजनी तत्पर | तेव्हा हरिहर नाचतसे ॥२॥
कृष्ण विष्णु नाम अच्युत अनंत | सगुण निश्चित स्मरा वेगी ॥३॥
नामा म्हणे नको उदंड सायास | तोडी भवपाश रामनामे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग