(निर्याणाचे अभंग)
3622.
(निर्याणाचे अभंग)
संती केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥
काही ठेविले चरणी । घेती तेचि पुरवूनि ॥धृपद॥
तुका पायवणी । घेऊनिया निराळा ॥२॥
नसता काही संचित । भेटी झाली अवचित ॥३॥
देव मिळोनिया भक्त । तुका केलासे सनाथ ॥४॥
अर्थ :
संतांनी माझा अंगीकार केला आहे त्यांना माझ्याविषयी फार मोठा अभिमान वाटत आहे. त्यांच्या चरणाजवळ काहीही प्रेमाने ठेवले की ते मान्य करुन घेतात. त्यांचे चरणतीर्थ मी घेऊन त्यांच्यापासून वेगळा उभा राहात आहे. काहीही माझे पूर्वपुण्य नसताना संतांची अवचितच मला भेट झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव आणि भक्त या दोघानीही मिळून मला सनाथ केलेले आहे.
