म्हणे आता मना स्त्रि
23.
म्हणे आता मना स्त्रियेची हे दशा ।
आता तू सहसा राहो नको ॥१॥
चाल वेगी जाऊ तीर्थासी वैराग्य ।
आमचे हे भाग्य वोडवले ॥२॥
सासू सासरियास केला नमस्कार ।
आहे स्त्री गरोदर मास तीन ॥३॥
आपण जातो तीर्थयात्रा करावया ।
देवलसी स्त्रिया यत्न कीजे ॥४॥
न पाहे मी मुख सर्वथा इयेचे ।
हीनत्व आमुचे कोण फेडी ॥५॥
भंडिमा सोसून कोण राहे येथे ।
ऐसिया स्त्रियेते कोण पाळी ॥६॥
बहेणि म्हणे ऐसे बोलिला भ्रतार ।
मज पडे विचार मनामाजी ॥७॥
