ब्रीदावळी करे आपुली
1913.
ब्रीदावळी करे आपुली जतन । आलो मी शरण जनार्दन ॥१॥
राखीं माझी लाज पतित पतित । तुझा मुद्रांकित रंक एक॥२॥
काम क्रोध लोब दंभ अहंकार । हे हेही अनिवार सोसवेना ॥३॥
आशा मनीषा माया सखीया सांगातिणी । करिती गौसणी सदा जीवा ॥४॥
चित्त वित्त आशा लागलीसे पाठी । इहीं जीवे साठी केली मज ॥५॥
जनार्दना शरण अनन्य पै एका । काये वाचे देखा चरणीम विनटला ॥६॥
