विश्रांतीचे आसन घालु
883.
विश्रांतीचे आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम ॥१॥
सर्व याती वर्णा आहे अधिकार । रामनाम उच्चार सोपा बहु ॥२॥
कल्पना अविद्या टाकुनी उपाधी । रामनामे समाधि उघड दिसे ॥३॥
एका जनार्दनी नाम पवित्र परिकर । साधनाचे सार हेंचि एक ॥४॥
