नामे प्रायश्चिती शिक
882.
नामे प्रायश्चिती शिक । हाचि देख परमार्थ ॥१॥
श्रेष्ठ नाम पावन जगी । तरतीं अंगी अधम जन ॥२॥
नेणती यांसी सोपे वर्म । जाणती कर्म सर्वही ॥३॥
कळाकुसरी कांही नका । वाचे घोका रामनाम ॥४॥
एका एकापणें मीनला । एका जनार्दनी भेटला ॥५॥
