सुखाचे हे नाम आवडींन
58.
सुखाचे हे नाम आवडींने गावे । वाचे आळवावे विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार । नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
काम क्रोधांचे न चलेचि कांही । आशा मनशा पाही भूर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचे म्हणे हरि हरि । म्हणतसे महारी चोखियाची॥ ॥४॥
