वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079520 · अभंग क्र. ३९०६

3906.
(बाळक्रीडा अभंग)
भोगिला गोपिका यादवा सकळा । गौळणीगोपाळा गाईवत्सा ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥
भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीच झाली कृष्णरूप ॥३॥
रूपे दाखविले होता भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाही ॥४॥
नाही राहो दिले जाता निजधामा । तुका म्हणे आम्हासहित गेला ॥५॥

अर्थ :
श्रीकृष्णाचा सुख भोग सर्व गवळणी, गोपीका, गोप, यादव, गाई, वत्स या सर्वांनी भोगला. सर्व गोपाळांनी देवाचा अंगसंग केला त्या श्रीरंगराला प्रत्यक्ष डोळे भरुन त्या सर्वांनी पाहिले व तृप्ती होईपर्यंत आनंदाने त्याचे गीत गाईले. त्या सर्वांना नवविधा भक्ती घडली व सर्वजण कृष्णरुपच झाले. जोपर्यंत भक्तांच्या मनामध्ये मी भक्त तो देव असा भिन्न भेद होता तोपर्यंतच देवाने आपले सगुण रुप भक्तांना दाखवले आणि एकदा की, भक्तांचे व देवाचे ऐक्य झाले मग त्यांच्यामध्ये भेद राहातच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी श्रीकृष्ण निज धामाला गेला त्यावेळी आम्हाला कोणालाही खाली राहू दिले नाही आमच्या सहीत तो निजधामाला गेला होता.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग