(बाळक्रीडा अभंग)
3907.
(बाळक्रीडा अभंग)
गेला कोठे होता कोठुनिया आला । सहज व्यापला आहे नाही ॥१॥
आहे साच भावे सकळव्यापक । नाही अभाविक लोका कोठे ॥२॥
कोठे नाही ऐसा नाही रिता ठाव । अनुभवी देव स्वये झाले ॥३॥
जातो येतो आम्ही देवाचे सांगांत । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥
अर्थ :
भगवंत श्रीकृष्ण कोठून आला व कोठे गेला हे कोणालाही माहित नाही परंतु तो सहजच सर्वत्र व्यापक आहे. ज्यांचा देवाविषयी खरा भक्तिभाव आहे त्यांच्यासाठीच देव सर्वत्र व्यापक आहे. अभाविकांसाठी तो कोठेही नाही. देव कोठे नाही देव सर्वत्रच व्यापलेला आहे असा ज्याचा अनुभव आहे ते स्वत: देवरुपच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाचे नाम गात वैकुंठाला जातो व पुन: त्याच्याबरोबरच येतो म्हणजे आम्ही नेहमी देवाबरोबरच असतो.
