वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

कांसवीची पिली करुणा

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090116 · अभंग क्र. १७१

171.
कांसवीची पिली करुणा भाकी । परि सांपडली निकी चरणसोय ॥१॥
कामधेनु घरी हरि माझा गोपाळ । मज काळवेळ नाठवे तैसी ॥२॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन । तरीच शोके प्राण तृषा हेतु ॥३॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु । नामाचा उच्चार तेणे छंदे ॥४॥

अर्थ:
कासवीला स्तन नसतात त्यामुळे कासवीच्या पिलानी त्याच्या चरणकमलांची याचना केली व दृष्टीतुन प्रेमपान्हा पाजायचे वरदान कासवीला मिळाले.त्यामुळे त्या हरिचरणांवर शरणागती केली तर तीच कामधेनु त्या भक्ताघरी येऊन राहते मग तो निवांत काळवेळातीत होऊन हरिभजनात लीन होऊ शकतो. चातक पक्षी जमिनीवरचे पाणी पित नाही पावसाचे पाणी पितो व तो पडलाच नाही तर शोक ग्रस्त होऊन तृषार्थ होऊन त्याचे चिंतन करतो. निवृतिनाथ म्हणतात सतत स्वानंदात राहणारी माझी गुरुमाऊली माझी कामधेनु झाल्यामुळे मी सतत नामस्मरणाचा छंद जोपासत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग