वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पाईकाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079517 · अभंग क्र. ३६३२

3632.
(पाईकाचे अभंग)
पाईकांनी पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा साठा मोडोनिया ॥१॥
पारखिये ठायी घेउनिया खाणे । आपले ते जन राखियेले ॥धृपद॥
आधारेंविण जे बोलता चावळे । आपले ते कळे नव्हे ऐसे ॥२॥
सांडिता मारग मारिती पाईक । आणिकासी शीक लागावया ॥३॥
तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥४॥

अर्थ :
संत महात्मे साधू हे देखील देवाचे शूर शिपाई आहेत त्यांनी परकीयांचा म्हणजे चार्वाकादिकांचा मतमतांतरांचा नाश करुन भक्ती अद्वैत नामसंकीर्तन करुन कर्माचा मार्ग चालविला आहे. संतांनी परकीयांचा नाश करुन आपल्या विचाराची खाण लोकापुढे मांडली व आपल्या लोकांचे रक्षण केले. जे लोक वेदशास्त्राचा आधार घेऊन बोलत नाही व्यर्थ काहीतरी चावळल्यासारखे बडबड करतात असे मनुष्य आपल्या जातीचे म्हणजे देवाचे भक्त नाहीत हे लगेच कळून येते. जे लोक वेदशास्त्राला अनुसरुन वागत नाही त्या लोकांना संत महात्मे देवाचे खरे सेवक शासन करतात व त्यांना शासन केले की इतर लोक घाबरतात आणि इतरांना वेदशास्त्र मार्गाने चालण्याचे चांगले वळण लागावे यासाठीच ते संत महात्मे वेदशास्त्रानुसार न चालणाऱ्या लोकांना शासन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वातील लोकांना संत महात्मे आपल्या विश्वासात घेऊन देव वेद आणि धर्म यांच्याविषयी त्यांना उपदेश करुन त्यांना मोक्ष सुख देतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग