वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पाईकाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079606 · अभंग क्र. ३६३३

3633.
(पाईकाचे अभंग)
पाईक तो प्रजा राखोनिया कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईक पाईका नाईक । भाव सकळीक स्वामिकाजी ॥धृपद॥
तृणवत तनु सोने ज्या पाषाण । पाईका त्या भिन्न नाही स्वामी ॥२॥
विश्वासावाचूनि पाईकासी मोल । नाही मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाईका जतन करी त्यासी ॥४॥

अर्थ :
संत महात्मेरुपी देवाचे खरे सेवक प्रजारुपी भक्तांच्या कुळाचे रक्षण करुन परकीयांचे म्हणजे दुष्ट चार्वाकादिकांचे मूळ जाणून त्यांचे छेदन करतात. तोच एक खरा सेवक आहे व सर्व सेवकांमध्ये सर्वश्रेष्ठ सेवक आहे ज्याचा भाव स्वामीच्या कार्‍याकडे असतो. स्वामीचे कोणतेही कार्य करण्याकरता सेवक आपले शरीर अगदी तृणाप्रमाणे मानून स्वामीचे कार्य करतो व सोने म्हणजे त्याला दगडाप्रमाणे वाटते असे सेवक आणि स्वामी हे भिन्न नाहीत त्या दोघाचेही ऐक्य झालेले आहे. स्वामीच्या विश्वासावाचून सेवकाला मोलच येत नाही जर स्वामीचा विश्वास नसेल तर सेवकाने कितीही मोठया गप्पागोष्टी केल्या तरी त्या मिथ्या ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, सेवक आपल्या स्वामीला कधीही उणेपणा येऊ देत नाही स्वामीचा मोठेपणा सेवक कायम राखत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग