थोरली हे तुझी सखी मे
667.
थोरली हे तुझी सखी मेहुणी ती ।
असोनि लक्ष्मीपती दरिद्री का ॥१॥
शंख मेहुणा तो अक्षयी कोरडा ।
भूषण तव गाढा काय काज ॥२॥
राजाचे सोयीरे भीक मागताती ।
लज्जा कोणाप्रती सांग त्यांची ॥३॥
बहिणी म्हणे काही असो नसो स्वता ।
परी परचिंता थोर तोचि ॥४॥
